अनुसूचित समाजाच्या उद्धारासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील: आ. सुभाष देशमुख

अनुसूचित समाजाच्या उद्धारासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील: आ. सुभाष देशमुख

अनुसूचित समाजाच्या उद्धारासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील: आ. सुभाष देशमुख सोलापूर : अनुसूचित समाजाला भाजप पक्षाच्या माध्यमातून न्याय मिळणार आहे. समाज

अनुसूचित समाजाच्या उद्धारासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील: आ. सुभाष देशमुख

सोलापूर : अनुसूचित समाजाला भाजप पक्षाच्या माध्यमातून न्याय मिळणार आहे. समाजाच्या उध्दारासाठी केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजना गरजू घटकापर्यंत पोहचविण्याचे कार्य सुरु आहे, असे प्रतिपादन आमदार सुभाष देशमुख यांनी केले.
भाजप दक्षिण सोलापूर अनुसूचित जाती मोर्चा बैठक विकास नगर येथील कार्यालयात पार पडली. या बैठकीत नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले, त्या वेळी आमदार सुभाष देशमुख बोलत होते.
आमदार देशमुख म्हणाले की, अनुसूचित समाजासाठी अनेक योजना आहेत मात्र त्या अनेकांना माहिती नाहीत. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी त्या योजना लोकांपर्यंत पोहोचवून त्यांना त्याचा लाभ मिळवून द्यावा.
यावेळी दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रभारी व अनुसूचित जाती जिल्हाध्यक्ष चांगदेव कांबळे, तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी, सभापती सोनाली कडते, पक्षनेते अण्णाराव बाराचारी, जिल्हा सरचिटणीस बादलसिंह ठाकुर, ज्येष्ठ नेते हनुमंत कुलकर्णी, अनुसूचित जाती तालुकाध्यक्ष बलवान गोतसुर्वे, पं . स. सदस्य शशिकांत दुपारगुडे, पंडितराज कोरे, तालुका सरचिटणीस संगप्पा केरके, आप्पासाहेब मोटे, गौरीशंकर मेंडगुदले, दिपाली व्हनमाने, सुरेखा राठोड व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS